Wel Come to our Small Bloger Web site : JaVa Saka Manch / " जात वैधता संरक्षण कानून मंच " या Bloger Website मध्ये आपले स्वागत आहे ....धन्यवाद

माना जमात संस्कृती ची थोडक्यात माहिती .

माना जमातीच्या संस्कृतीची थोडक्यात माहिती.
    माना जमातीचे मुख्य सण आखाडी, जांभुळअवस, नागपंचमी, माही, नागदिवाळी आहे.
    पारंपारिक व्यवसाय शिकार करणे, शेती राखणे, डिंक,टोरी इत्यादी गोळा करणे व ते विकणे असा आहे.
    मातृभाषा मराठी, जमातीची भाषा अशुद्ध मराठी आहे.
    माना जमातीचे मुख्य देव डोंगरदेव, नारायणदेव, ठाकूरदेव, वाघोबा, नागोबा, माणिकादेवी हे आहेत. जमात पंचायत पंचायतीच्या प्रमुखास शेंडे म्हणत, परंपरागत नृत्य दंडार असून जमातीचे लोक सण व लग्नसमारंभात नाचत असे.
    जमातीचे खाद्य भात, कंदमुळे, फळ, मोहाचे व धोप्याच्या पानाचे पिठाचे मुठे होते.
    जमातीचे मुख्य पेय आंबील (ज्वारी-बाजरी इत्यादीची) मोह फुलाचा रस हे आहेत.
    निषिद्ध व्यवसाय हा प्रत्येक कुळाप्रमाने वेगळा असतो. किंवा कोणत्या कुळाला नसतो. उदा. श्रीरामे कुळाचा निषिद्ध व्यवसाय हा डुकराची शिकार करणे म्हणजे पाप आहे.
    विवाह जमण्यासाठी व करण्याची पारंपारिक पद्धत ही जमात पंचायत प्रमुखाच्या समक्ष व आई-वडिलांच्या संमतीने विवाह जोडल्या जातो. आपल्या जमातीमध्ये कुळ पद्धतीने विवाह जोडतात. सारखे मामकुर असलेल्या कुटुंबाचा विवाह होत नाही.
    अंत्यसंस्काराची पद्धत ही मृताला जळताना दक्षिणेकडे तोंड ठेवतात. तिसरा दिवस असतो. तीन दिवस विटाळ पाळतात.
    सणाच्या दिवशीची पूजा,खनपूजा, मुठपूजा, डायका करतात.
    स्त्री गरोदर असताना सातवी नावाचा विधी करतात.
    मूल जन्मानंतरचा विधी नाळ कापून समुद्रात पुरवतात. सात दिवस विटाळ पाडतात.
    जमातीचा पोशाख कोणता अर्ध्या बाह्याची बांडी, आखूड धोतर व लंगोटी असा आहे.
    जमातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य निसर्गपूजक संस्कृती.
    माना जमातीच्या राज्यांची नावे हे कुरुम प्रहोद, गहिलू, वज्रांकुर, विश्वांकुश, सुरत बडवाईक, कोलवा वाघ अशी आहेत.
    जमातीचे स्वातंत्र्यसैनिक कटू झीनू माना हे आहेत.
    जमातीचे ज्येष्ठ समाजसेवक आडकुजी पाटील नन्नावरे, त्र्यंबकरावजी ढोक गुरुजी, म. सी. जांभुळे गुरुजी,
    संविधानात पाचव्या सुचित आदिवासींना स्वयंशासन व मालकी विशेष अधिकार दिलेला आहे.
    आपली जमात संविधानाच्या ३४२ व्या कलमाअंतर्गत अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
    महाराष्ट्र राज्यात १८ व्या क्रमांकावर असून मध्यप्रदेशात व छत्तीसगड राज्यात १६ व्या क्रमांकावर आहे.
माना जमात संस्कृती बद्दल सविस्तर माहिती

            
01) जन्म : -
           माना जमातीतील बाळंतिणीस बाळंतपणाच्या वेळी सात दिवस अशुद्ध समजून कुटूंबापासून अलग असलेल्या खोलीत ठेवत असत. बाळ झाल्यानंतर बाळाची व तिची आंघोळ करण्यासाठी खड्डा खोदल्या जात असे, त्यालाच "न्हाणी" म्हटल्या जात असे. पाचव्या दिवशी बाळाची पडलेली नाळ त्या खड्ड्यात पुरून पुजा करीत असत व त्यावर रात्रभर दिवा तेवत ठेवत असत व सातव्या दिवशी घरातील सगळे कपडे-लत्ते धुवून घरं मातीने सारवून शुद्ध केल्या जात असे त्याला "सातवी" म्हणत असे. या दिवशी मोहफुलापासून तयार केलेले मुट्ठे बायकांना वाटल्या जात असे. बाराव्या दिवशी जमातीतील बायकांना बोलावून बाळाला पाळण्यात घालत व नांव ठेवत त्यावेळेस बाळाच्या पाळण्याखाली घुगऱ्या ठेवत व त्या सर्व बायांना वाटत. या दिवशी आपल्या जमातीच्या रितीरिवाजाने गाणे म्हणण्याची प्रथा होती. बाळाचे नाव प्रामुख्याने निसर्गातील वृक्षांच्या नावांवरून उकारार्थ ठेवल्या जात असे. उदा. डोंगरु, कचरु, पांडू, रंगु, महारु इत्यादी. कारण ही जमातच निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्यास होती. बहुतेक बाळंतपणं स्त्रियांच्या माहेरीच केल्या जात असत. बाळंतपणाची कामे परधान जातीतील किंवा महार जातीतील वयोवृद्ध स्त्री करीत असे, तिला सुईण किंवा दायीण असे म्हणतात. ती सुईण बाळाची व बाळंतिणीची आंघोळ तसेच इतर कामे करत असे. त्याबद्दल तिला धान्य व वस्त्राच्या स्वरूपात मोबदला देत असत. बाळंतिण बाईला पाहिले दोन दिवस गुळाचे पाणी पिण्यासाठी दिले जाई व नंतर हलके, मऊ अन्न खाण्यास देत असत. उदा. आंबील, तांदळाची खीर किंवा तांदळाचे उकडलेले वडे इत्यादी.
02) शारिरीक ठेवण :-
           या जमातीचे बहुतांश लोक अंगकाठीने ठेंगणे, काटक, काळ्या रंगाचे पसरट चेहऱ्याचे व लाजाळू वृत्तीचे आहेत.या जमातीत जुन्या बाया अंगावर गोंदन करीत असत. गोंदवनाला त्या अलंकार समजत असत.
03) पोषाख :-
           या जमातीच्या पुरुषांचा पोषाख अगदी साधा, आखुड धोतर, बंडी असा असतो. स्त्रियांचा पेहराव हा एकटांगी गुडघ्यापर्यंत दीडपट लुगडे व पट्ट्याची अर्धचोळी घालीत असत. हातांमध्ये जाड काचांच्या हाताच्या कोपरापर्यंत बांगड्या, चांदीचे सरी आणि साखळी भुयेत बाहुटे, पायात वाक्या आणि पायाच्या बोटात जोडवे मनगटात माझ्या (ऐरापाटल्या). पूर्वीचे लोक तर अर्धनग्न राहात असावेत असे वाटते. आजच्या सुधारलेल्या काळानुसार त्यांचे पोषाखात सुधारणा होत आहेत.
04) आहार :-
           त्यांचा आहार अत्यंत साधा असतो. जंगल विभागात वास्तव्याने असल्यामुळे शिकार करुन मास भक्षण करणे व मोहफुलांपासून तयार केलेली मद्य पिणे त्यांना मनापासून आवडते.. तयार केलेली मद्य पिणे त्यांना कंदमुळे जमा करणे, सुकवून ठेवणे, मासाचे तुकडे सुकवून ठेवणे इ. प्रकारांनी ते भविष्यातील तरतूद करुन ठेवतात. अज्ञान व दारिद्रय असल्यामुळे तांदुळ किंवा ज्वारीचे पिठापासून तयार केलेले पातळ पेय म्हणजे आंबील त्यांचे आहारातील अत्यंत आवडीचे पेय होय. समकक्ष लोकांमध्ये असलेला सलोखा व आप्तभाव व्यक्त करण्यासाठी आंबील पेय देवून सन्मान केला जातो. त्यावरूनच 'गोंड, गोवारी हेकड़ माना आंबील पाहून शिवला डोना ही म्हण प्रचलित आहे.
05) सण :-
          माना जमातीत आखाडी, जांभुळ अवस, नागपंचमी, दसरा, नागदिवाळी, मही (माही) इत्यादी सण प्रामुख्याने पाळतात. ही जमात नागवंशीय असल्यामुळे नागाची व महादेवाची (परसापेण) पुजा करतात. या जमातीतील आखाडी हा वर्षाचा पहिला सण होय. या दिवशी जमातीतील लोक आपआपल्या कुलदेवतांची देव किंवा देवके पुजतात. प्रत्येक कुळांची देवके अलग अलग आहेत. त्यानुसार मुठपूजा मांडतात.
  • 01) नागदिवाळी :-
              नागदिवाळी म्हणजे मार्गशिर्ष महिन्याची अमावस्या होय. तिलाच कोदवस म्हणतात. या दिवशी नागदिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी मोट व बरबटीच्या घुगऱ्या करून ठाकुर देवाला दिवा लावतात व डफ वाजवतात. हा सण वैयक्तीक किंवा सामुहीक साजरा करतात.
  • 02) मही (माही) :-
               मही या सणाच्या वेळी मेलेल्या पुर्वजांना भगताच्या मार्फतीने उतरविण्याची पध्दत आहे. माहीच्या वेळी देवाला बकरा, कोंबडा, वराह (डुक्कर) चा बळी दिला जातो. त्याचे मांस भक्षणही केल्या जाते. देवाला डहाका वाजवून गोंधळ करतात. या सणाला जमातीतील लोक विशेष महत्व देतात. मृत व्यक्तीच्या नावे लहानशी धातु प्रतिमा तयार करुन तिची पुजा करण्याची प्रथा काही कुटुंबात आढळते. म्हणजेच मृत व्यक्तीला देवत्व दिल्या जाते.
  • 03)
              
06) वंश परंपरागत व्यवसाय :-
           माना जमातीचा परंपरागत व्यवसाय शिकार, ग्रामसंरक्षक व पिक संरक्षक असा होता. या जमातीचे लोक वैयक्तिक किंवा सामुदायिक पध्दतीने शिकार करीत असत. तसेच जंगलातील मोहाची फुले वेचणे, डिंक गोळा करणे, हिरडा, बिब्बा, तेंदुची फळ गोळा करून विकणे, कंदमूळ गोळा करून विकणे किंवा खाण्याकरीता वापर करीत. जंगलातील वन्य पशुंची शिकार करणे आणि ते विकून आवश्यक वस्तुची खरेदी करून आपल्या गरजा पूर्ण करीत. काही आडनावे किंवा कुळं शिकारीवरून किंवा व्यवसायावरुन पडलेली आहेत. उदा. घारीची शिकार करणारे घोरमारे, शेळ्या राखणारे शेरकुरे, रानाचे संरक्षण करणारे, रणवासी रंधये इत्यादी. आता बहुसंख्येनी शेतमजुरी, जंगलतोड व शेती हे व्यवसाय करतात.
07) मनोरंजन :-
           प्रामुख्याने माना जमातीचे लोकांनी दंढार हा लोककलेचा प्रकार रुढ केला. एखादे कथानक निवडून त्याला पद्यमय गावून व लयबध्द नाचत. यामध्ये प्रामुख्यान ढोलक, चोनका व मंजीरा वाद्य वाजवित.
08) माना जमातीची देवते :-
           ठाकोरदेव, नारायण देव, माणिका देवी, डोंगर देव, वाघदेव, नागोबा, महादेव इ. गोरजाई (वैरागडला आहे.) माना जमातीचे देवके ठरल्याप्रमाणेच ४, ५, ६, ७ व ९ अशी असतात. परंतु माही व आखाडी पुजेला कुटुंबातील कुणी मृत्यू झाल्यास उतरण करुन वराह बळी देतात व बळी देवून देव घडवितात.
09) लग्न पध्दती :-
           माना जमातीत त्यांच्या पंचायती मार्फत लग्न जोडतात. पंचायतीला वधु-वराकडून देणगी द्यावी लागते. लग्नाच्या आदल्या दिवशी डहाका वाजवून कुल देवतांची पुजा करुन कोंबडा / बकरा बळी देवून सामुहिक भोजन करतात. पुर्वी लग्न जुळवतांना वर पक्ष वधुपक्षाला काही ठराविक धान्य व पैसा, कपडा देज म्हणून देण्याचे कबुल केल्याशिवाय लग्न जुळत नसत. आता त्यामध्ये हळुहळु परिवर्तन घडून येत आहे.
माना जमातीचे लग्नविधी त्यांचे जमातीचेच लोक लावतात. या प्रसंगी ढोल, नगारे व डफडे विशेषकरुन परधान आदिवासी वाजंत्र वाजविणे यांचाच सर्वसाधारण उपयोग करतात. वर कुलपध्दतीत दर्शविल्याप्रमाणे त्या जमातीत कुळ जोडातील कुळांत लग्न लागत नाहीत. लग्न जोडण्याकरिता वेगवेगळ्या जोड्यांची कुळे हवीत. या जमातीत एकपत्नी, द्विभार्या लावणे, बालविवाह इ. चा प्रघात आहे. वराला घोंगड्याची घोंगुसली घालून त्याला वराचा मामा कडेवर बसवून परणू नेण्याची
10) पंचायत पध्दती :-
           या जमातीत पंचायत पध्दती फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. गावातलेच प्रमुख जमात पंच मिळून जमात पंचायत होत असे. श्रीरामे व दडमल या कुळांचे लोक पंचायत प्रमुख असत. पंचायत प्रमुखास शेंड्या म्हणत. या पंचायतीच्या सल्ल्याने जमातीची सर्व कामे होत असत. कुणी तोंडाने “वाहान’ / जोडा" मारतो म्हटले तरी त्यांना जमात विटाळ (वाळीत) ठेवीत असे. त्याचे कडून दाढी, मिशी, शेंडी, मुंडन करुन व कॉबडे, बकरे व पैशाचा दंड वसुल करुन गावकुसाच्या नदी/नाल्याचे किनारी दारु व जेवन घेवून शुध्द झाल्याचे पंचानी जाहिर केल्याशिवाय त्याला जातीत परत घेत नसत. सर्व जमात पंचायतीच्या जबरीत असे . त्यांनी दिलेला निवाडा अंतीम मानत असत.
11) प्रसुती पध्दत:-
           या जमातीत सुईनपणाची पध्दत नव्हती. बाळंतीनीला सात दिवस अशुध्द व समजून कुटूंबीयापासून अलग ठेवतात. पाचवीला ि बाळंतीनीची नहाणी व बालकाचे नाळ जेथे पूरतात, तो गड्डा बंद करुन पुजा करतात. सात दिवसानंतर घराचे सारवण करुन शुध्द करतात. घरातील सर्व कपडे धुतात. कुकुस (कोंडा) व मोहाचे मुठ्ठे करुन उडीदाचे दाळीचे घसरवडे करुन शेजारच्या स्त्रियांना वाटतात. १२ व्या दिवशी या जमातीचे स्त्रियांना ग बाळंतीनीच्या घरी बोलावून बाळाला पाळण्यांत घालून नांव ठेवतात व पाळण्याखाली ठेवलेल्या लाख द ज्वारीच्या घुगऱ्या सर्व स्त्रियांना वाटतात.
12) अंधश्रध्दा व जादुटोना :-
           या जमातीचे लोक अंधश्रध्देवर म्हणजेच जादुटोना, मंत्रतंत्र व भुतखेतावर विश्वास ठेवतात. विज्ञानावर अजूनही विश्वास बसत नाही.
अजूनही बळी दिल्याशिवाय पुजा पूर्ण होत नाही.
13) अंत्यसंस्कार :-
           या जमातीचे लोक मृत व्यक्तीला माती देतात, तर काहींना जाळतात. मृतांचे प्रेत सरणावर उत्तर-दक्षिण दिशेने पालथे करुन ठेवतात व अग्नी देतात. त्यानंतर सोयरा मृताच्या वडील मुलास पाण्यात डुबकी मारावयास लावून प्रेताच्या भोवताल प्रदक्षिणा मारुन प्रेताच्या डोक्याला बांबूच्या काठीने टोचून डोके फोडतो, त्यालाच 'कवटी फोडणे' असे म्हणत. नंतर सगळेजण मृत व्यक्तीच्या घरी परत येवून पाण्याचा गुरळा घेतात. मृत व्यक्तीच्या घरी तीन दिवस सुतक म्हणजे विटाळ पाळतात. या दिवसात जमातीतील लोक त्यांना जेवणाकरिता अन्न आणून देतात, त्याचेच ते जेवण करतात, त्यालाच कडूघाटा म्हणतात.
प्रेतावर अंत्यसंस्कार करावयाच्या वेळी प्रेताला गरम पाण्याने आंघोळ घालतात. नविन वस्त्र नेसवतात , त्याच्या वस्तु त्याच्या सोबत ठेवतात. मृताचा मुलगा तिरडी धरतो, तिरडी तीन बांबूच्या काठ्या बांधून केलेली असते. गावाच्या बाहेर गेल्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी प्रेत खाली ठेवतात. ती तिरडी एका हातात कुऱ्हाड तर दुसऱ्या हातात सुप असते. त्या सुपात चार-पाच कडधान्याच्या दाळी असतात. गावाच्या बाहेर गेल्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी प्रेत ठेवून त्याची पूजा करुन मृताला दफन करतांना उत्तर-दक्षिण ठेवून माती टाकून बुजवून देतात व त्यावर पांढऱ्या रंगाचे दगड ठेवत, त्याला 'माती देणे' असे म्हणत.
           माना जमातीत एक वैशिष्ट्येपूर्ण दंडक आहे, तो म्हणजे मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गावातील जमातीतील प्रत्येक घरातील एका तरी व्यक्तीने हजर राहिलेच पाहिजे असा दंडक असून, त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यासाठी अंत्यसंस्कार झाल्याबरोबर हजेरी घेतली जाते. हजर नसणाऱ्यांवर आर्थिक दंड ठोठावण्यात येत असे. आर्थिक दंड न भरणाऱ्यास सामाजिक बहिष्कार टाकल्या जात असे. मृताला माती दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी दाढी-मिशीचे व डोक्याचे केश काढून शुध्द केल्या जाते. त्याला 'चोकटिवा' म्हणतात. मृत व्यक्तीचा सोयरा मृत व्यक्तीच्या मुलाच्या हाती हराळी गवताची मुळी देवून महादेवाचे दर्शन घेवून त्यांना खांडसुपारी दिल्याशिवाय जेवण करत नसत. जेवण झाल्यानंतर मृतांच्या घरी थांबत नाही.
           तिसऱ्या दिवशी मृत व्यक्तीला शांती मिळावी म्हणून त्याला नैवद्य म्हणून द्रोणात शिजविलेले अन्न गावाच्या सिमेवर मृताचा मुलगा नेत असे. तेव्हा त्याच्या सोबत त्याचा सोयरा राहत असे. जमातीतील सधन लोक मृताचे शेवटचे कार्य म्हणुन २१ व्या दिवशी सर्व नातेवाईकांना निमंत्रित करुन गोड जेवन देत असत, त्यालाच "पाऊण मासा " असे म्हणत.

No comments:

Post a Comment